गुड्डूराम कुडयामी या नक्षलवाद्यास अटक

15 दिवसात 3 नक्षल्यांना अटक ; गडचिरोली पोलीस दलाचे यश

0
129

गडचिरोली दि.22 फेब्रुवारी -जहाल नक्षलवादी गुडू राम कुडयामी (वय २३ वर्षे रा. सागमेटा ता. भैरमगड जि. बिजापूर) यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले आहे. विशेष अभियान पथक प्राणहिताचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना सी-६० पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे सदर नक्षलवाद्यांस अटक करण्यात यश प्राप्त झाले आहे.उपपोस्टे जिमलगट्टा हद्दीतील मौजा किष्टापूर नाल्यावर सन २०२० साली नक्षलवादयांकडुन करण्यात आलेल्या वाहन जाळपोळीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असून, याबाबत उपपोस्टे जिमलगट्टा येथे दाखल गुन्हयात त्यास अटक करण्यात आले असुन, मागील १५ दिवसांत गडचिरोली पोलिसांनी एकुण ०३ नक्षलींना अटक करण्यात आले आहे या कारवाईत शामिल जवानांचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल  अपर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया , अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.

 पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  गुडू राम कुडयामी हा  2017 मध्ये मुक्कावेली आरपीसी मिलीशिया प्लॉटुनमध्ये भरती झाला असुन, तो भरमार हत्यार सोबत बाळगत होता. त्याने 2017 मध्ये गरतुल येथे 15 दिवसांंचे नक्षली प्रशिक्षण घेतले होते. उपपोस्टे जिमलगट्टा हद्दीतील मौजा किष्टापूर नाल्यावर सन २०२० साली करण्यात आलेल्या वाहन जाळपोळीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असून, याबाबत उपपोस्टे जिमलगट्टा येथे  भादंवि कलम 435, 427, 324 व भाहका कलम 03/25 नुसार गुन्हा दाखल असुन, त्यामध्ये तो फरार होता. छत्तिसगड मधील मौजा सागमेटा येथील विज्या कुडयामी, मौजा दामाराम या गावातील गुज्या वड्डे, मौजा मंडेम गावातील बुधू तसेच मौजा लंकापार व येडसगुंजी येथील सहायक आरक्षक
रमेश याचे खुनामध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. त्याचबरोबर मौजा परसेगड येथे झालेल्या पोलीस- नक्षल चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असून, सदर नक्षलवाद्यांवर मौजा परसेगड पोलीस स्टेशन जि. बिजापूर येथे गुन्हे दाखल आहेत.  अनेक गुन्ह्यामध्ये हा आरोपी फरार होता. या व्यतिरिक्त आणखी किती गंभीर गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग आहे. याचा तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.

जिमलगट्टा उपपोलीस स्टेशन हद्दीतील किष्टापूर नाल्यावर 2020 साली नक्षलवाद्यांकडुन करण्यात आलेल्या वाहन जाळपोळीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे जिमलगट्टा उपपोस्टे येथे दाखल गुन्हयात त्यास अटक करण्यात आली आहे.  मागील 15 दिवसात 3 नक्षल्यांना अटक करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.