
चंद्रपूर,दि.25ः- राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेतून साकारलेल्या चंद्रपूर-मुल मार्गावरील चीचपल्ली येथील बांबू रिसर्च सेंटरला आज दुपारी अचानक आग लागली.या आगीत बांबू सेंटरची बांबूपासून तयार इमारत पूर्णतः जळून राख झाली. यात कुठलीही मनुष्य हानी झाली नसली तरी करोडो रुपये खर्च करून केवळ बांबूचा उपयोग करून उभारलेली हि इमारत जळून राख झाली आहे.ही आग कशामुळे लागली याबाबत अद्यापही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.





