33.7 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ भंडारा 20,गडचिरोली जिल्हयात 8,गोंदियात आज 24 सकारात्मक रुग्ण

भंडारा 20,गडचिरोली जिल्हयात 8,गोंदियात आज 24 सकारात्मक रुग्ण

0
212

blank

गोंदिया- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 25  फेबुवारी रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात 24  रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली.
आजपर्यंत 14389 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 14,108 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 96 आहे. 56 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 185 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 98.02 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.20 टक्के आहे तर डब्लिंग रेट 380.2 दिवस आहे.

भंडारा दि. 25: जिल्ह्यात आज 10 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 13058 झाली असून आज 20 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13568 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.24 टक्के आहे.आज 858 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 20 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 1 लाख 29 हजार 812 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 13568 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

       जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 06, मोहाडी 04, तुमसर 05, पवनी 00, लाखनी 04, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 01 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 13058 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 13568 झाली असून 183 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 327 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.24 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.41 टक्के एवढा आहे.रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

आज 8 नवीन कोरोना बाधित तर 4 कोरोनामुक्त

 गडचिरोली,दि.25: आज जिल्हयात 8 नवीन  कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 4 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9490 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9311 वर पोहचली. तसेच सद्या 74 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.78 टक्के तर मृत्यू दर 1.11 टक्के झाला.

नवीन 8 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 5 जणाचा समावेश असून चामोर्शी  तालुक्यातील 02, तर  मुलचेरा तालुक्यातील 01, जणाचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 4 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 3 , वडसा 1, जणाचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील कोटगल 1, गांधी वार्ड 1, कन्नमवार नगर 1, आयटीआय चौक 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये नवोदय विद्यालय घोट 1,  स्थानिक 1, बाधिताचा समावेश आहे. मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये विवेकनंदपूर 1, तर इतर जिल्हयातील 1 बाधिताचा समावेश आहे.