29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राष्ट्रीय देश राजधानीत संत रविदास महाराज आणि कव‍िश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती साजरी

राजधानीत संत रविदास महाराज आणि कव‍िश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती साजरी

0
33

नवी दिल्ली दि. २७ :  संत रविदास महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राजशिष्टाचार आणि गुंतवणुक आयुक्त निधी पांडे यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

blank

परिचय केंद्रात संत रविदास आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती साजरी

महाराष्ट्र परिचय केंद्रात आज संत रविदास आणि वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी परिचय केंद्राचे उपंसचालक दयानंद कांबळे,  दै. सकाळ नवी दिल्लीच्या वृत्त विभागाचे  प्रमुख अनंत बागाईतकर, प्रतिनिधी मंगेश वैंशपायन यांनी संत रविदास आणि कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्प अपर्ण अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार, ग्रंथपाल रामेश्वर बर्डे तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

blank