
औरंगाबाद, दि.28– शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपाययोजना म्हणून महानगरपालिका प्रशासनाने 28 फेब्रुवारी पर्यंत 5 वी ते 9 वी आणि 11 वीचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हे आदेश वाढवून 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहे. कोरोना झपाट्याने वाढत असल्याने शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय यांनी घेतला आहे. शाळा, महाविद्यालयात प्रशासकीय कामे सुरु असतील. दहावी व बारावीचे वर्ग कोरोनाचे काटेकोर नियमांचे पालन करत सुरु असतील. कोचिंग क्लासेस यांनाही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. 5 वी 9 वी आणि 11 वीचे वर्ग बंद असतील. आदेशाचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असे आदेशात म्हटले आहे.