साकोली: शासनाने मंजुर केलेल्या घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी रेती आवश्यक आहे. तालुक्यातील घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना रेती मिळणार आहे असे प्रशाशानाद्वारे सांगितले होते. परंतु अद्यापही रेती मिळाली नसल्याची खंत घरकुल लाभार्थींनी व्यक्त केली आहे.
तालुक्यातील अनेक रेती घाटांचा लिलाव झाला नसल्याचे कारण सांगून आजही रेती विक्रेते भक्कम पैसे आकारत आहेत. त्यात घरकुल लाभार्थींची आर्थिक कोंडी लुट सुरू झाली आहे. अशा स्थितीत घरकुलांचे बांधकामाचे स्वप्ने भंग होत असल्याचे चित्र पुढे आले आहे.
सध्या स्थितीत अनेक ठिकाणी गरिबांच्या आवासांची सोय व्हावी, हक्काचे घर असावे,यो्ग्य सुरक्षित निवारा असावा यासाठी प्रधानमंत्री आवास योजना., आदिम कोलाम घरकुल योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना अशा विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत. या योजना राबविण्यात आल्या असल्या तरी अजूनही कोरोनाचे नांव घेऊन आवश्यक असणारा फंडही लाभार्थींना देण्यात आले नाही. त्यामुळे अर्धवट अवस्थेत असलेल्या घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. आजही चोरट्या मार्गाने रेती तस्करीची कामे केली जाऊन बड्या… बड्यांचे बांधकाम पूर्ण केले जात आहेत. यासाठी जबाबदार आहे तरी कोण?? असा प्रश्न? सहाजिकच निर्माण होत आहे. गरिबांना हक्काचे घर मिळाले तर अशा अनेक अडचणी येत आहेत. मात्र बड्या…. चे मोठमोठे कामे होऊन जातात. हे उघड्या डोळ्यांनी पहात रहाणारे नेते मंडळी नाकारु शकत नाही.





