41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home महाराष्ट्र नागपूरच्या समता प्रतिष्ठान संस्थेच्या कामांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक – सामाजिक...

नागपूरच्या समता प्रतिष्ठान संस्थेच्या कामांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

0
58

blank

मुंबई, दि. 3 : नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेच्या कामांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक नेमण्यात येईल. या प्रकरणी प्रथम दर्शनी दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य सुनील प्रभू यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री श्री.मुंडे म्हणाले की, या संस्थेमार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त जे कार्यक्रम घेण्यात आले त्याच्या खर्चाचा ताळमेळ लागत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची विशेष चौकशी पथकामार्फत केली जाईल, असेही श्री. मुंडे यांनी सांगितले.यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री नाना पटोले, सुधीर मुनगंटीवार यांनी भाग घेतला.

blank