33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता मोटारसायकलवरील नियत्रंण सुटल्याने दोन अपघातात तिघांचा मृत्यू तर एक जखमी

मोटारसायकलवरील नियत्रंण सुटल्याने दोन अपघातात तिघांचा मृत्यू तर एक जखमी

0
168

blank

चिचगड(सुभाष सोनवणे)दि.08:-देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या मुरमाडी व मेहताखेडा गावाजवळ झालेल्या दोन अपघातात तिघांचा मृत्यू झाला एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना 7 मार्चच्या रात्रीला घडली.

सविस्तर असे की, दि.७ मार्चच्या रात्री पन्नालाल सियाम व ललेस अरकरा ( दोघेही राहणार पलानगाव) हे लग्न समांरभातुन रात्रीच्या सुमारास पदमपुर गावाकडे परत येत असतानीा मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.त्यात पन्नालाल सियामचा जागीच मृत्यू झाला.तर ललेस अरकरा गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांच्याच मागे येत असलेल्या मोटारसायकलवर भुषण मडावी व फनिन्द्रं अरकरा ( दोघेही राहणार पदमपुर)यांना अपघात झाल्याचे दिसताच त्यांनी पन्नलाल सियाम व ललेस अरकराला रुग्णालयात भरती करण्याकरीता रुग्नवाहीका बोलावून त्यांना रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेत असताना त्यांच्या मागे मोटारसायकने जातांना  भुषण मडावी व फनिन्द्रं अरकरा यांचा मेहताखेडा गावाजवळ मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.या अपघातात दोघांना जबर मार लागल्याने घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला.सदर प्रकरणाचा तपास चिचगड पोलीस करीत आहे.

blank