
औरंगाबाद, दि.9 मार्च- 8 मार्च रोजी जिल्हा न्यायालय औरंगाबाद येथे जिल्हा वकील संघ औरंगाबाद यांच्यातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिवस या निमित्ताने महिला दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रम कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी सर्व नियमाचे पालन करून ठेवण्यात आलेला होता. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे उच्च न्यायालय वकील संघाच्या अध्यक्षा श्रीमती अँड सुरेखा महाजन तसेच डॉक्टर संध्या तलवार (असोसिएट प्रोफेसर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुकुंदवाडी) यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरी करताना त्यांनी महिला वकील यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष विलास पाटणी यांनी भूषवले. तसेच अँड संदीप शिरसाट, अँड प्रतिभा भराडे , अँड लता झोंबाडे, अँड आस्मा शेख, अँड सुनिता कर्मंकर , अँड संभाजी तवर व इतर महिला वकील यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.





