30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन

सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन

0
113

blank

मुंबई,(वृत्तसंस्था)- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे सध्या अडचणीत आलेले सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले आहे. यामुळे वाझेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सचिन वाझे हे सहायक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. पण मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी संशयित असलेल्या वाझेंना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता सचिन वाझे यांना पोलीस दलातून निलंबन करण्यात आलं आहे.

सध्या कोठडीत असलेल्या वाझे यांची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच विशेष शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आलेली. तसेच अटक करण्यात आल्यानंतर त्यांना निलंबित करण्याची मागणी केली जात होती.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या परिसरातली सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर 24 फेब्रुवारीला रात्री साधारण एक वाजता अंबानींच्या घराबाहेर दोन गाड्या आल्या होत्या. यातील स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडली होती.

blank