38.6 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ बोळुंदा शेतशिवारातील विद्युत ट्रांन्सफाॅर्मर जळल्याने शेतकऱ्यांचे रब्बी धानपिकाचे नुकसान

बोळुंदा शेतशिवारातील विद्युत ट्रांन्सफाॅर्मर जळल्याने शेतकऱ्यांचे रब्बी धानपिकाचे नुकसान

0
82

blank

कोसमतोंडी:-(महेंद्र टेंभरे):-सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी परिसरातील बोळुंदा येथील शेतशिवारात लावलेले विद्युत ट्रांन्सफाॅर्मर मागिल आठ दिवसांपासून जळले असून याची माहिती शेतकऱ्यांनी वीज वितरण विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना रितसर केली.आणि याठिकाणी नवीन ट्रांन्सफाॅर्मर लावण्याची मागणी केली.वीज वितरण विभागाने याठिकाणी दुसरे ट्रांन्सफाॅर्मर लावले.परंतु ते ट्रांन्सफाॅर्मर १२तासच चालले.आणि त्यामध्ये बिघाड आले.त्यामुळे वीज वितरण विभागाने नवीन ट्रांन्सफाॅर्मर आणून लावले पण तेही ट्रांन्सफाॅर्मर फक्त २४ तास चालून बंद पडले.त्यामुळे वीज वितरण विभागाबाबत शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
कोसमतोंडी परिसरातील बोळुंदा शेतशिवारात कोसमतोंडी येथील शेतकऱ्यांची शेतजमीन मोठ्या प्रमाणात आहे.शेतक-यांनी या शेतशिवारात उन्हाळी धानाची लागवड केली आहे.वीज कनेक्शन असणा-या शेतकऱ्यांनी वीज बिलाचा भरणा सुद्धा केला.पण वीज वितरण विभागाचे हलगर्जीपणामुळे लाईन वेळेवर राहत नाही.त्यामुळे उन्हाळी धान पिक धोक्यात आले आहे.त्यातच मागिल आठ दिवसांपासून विद्युत ट्रांन्सफाॅर्मर जळल्याने वीज वितरण विभागाने दोनदा दुसरे ट्रांन्सफाॅर्मर बसविले,पण तेही ट्रांन्सफाॅर्मर एक १२ तास व दुसरे २४तास सुरू राहून बंद पडले.त्यामुळे शेतकऱ्यांचे उन्हाळी धान पीक सुकलेले आहे . मागिल आठ दिवसांपासून विजेचा पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांचे उभे पीक करपत आहे.याला जबाबदार वीज वितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी आहेत.
वीज वितरण विभाग शेतकऱ्यांना नियमीत वीज पुरवठा करित नसून आठ दिवसांपासून बंद पडलेल्या ट्रांन्सफाॅर्मरच्या जागी नवीन ट्रांन्सफाॅर्मर न लावता नादुरुस्त व जुने ट्रांन्सफाॅर्मर लावून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उन्हाळी धान पीकांचे नुकसान होत आहे.आणि हाती आलेले पीक नष्ट होत आहे.पुर्वीच शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असून वीज वितरण विभागाचे भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना नियमीत वीज पुरवठा होत नसल्याने धान व इतर पिकांचे नुकसान होत आहे. वीज बिलाचा भरणा वेळेवर भरूनसुद्धा शेतकऱ्यांना नियमीत वीज पुरवठा करण्यात येत नाही.त्यामुळे वीज वितरण विभागाचे भोंगळ कारभारावर शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत.
बोळुंदा शेतशिवारात नादुरुस्त असलेले ट्रांन्सफाॅर्मर बदलून जुने ट्रांन्सफाॅर्मर न लावता नवीन ट्रांन्सफाॅर्मर लावुन नियमित वीजपुरवठा करण्यात यावा अशी मागणी मधुकर काशिवार,हिवराज काशिवार, राजेंद्र पशिने, जितेंद्र काशिवार,रामदयाल काशिवार, गजानन काशिवार,लोकेश काशिवार आणि अन्य शेतकऱ्यांनी वीज वितरण विभागाला केली आहे.