37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News टी-१ वाघिणीचे दोन बछडेही बेपत्ता

टी-१ वाघिणीचे दोन बछडेही बेपत्ता

0
62
file photo

blank

नागपूर,दि.17ः-उमरेड-कर्‍हांडला अभयारण्यात काही दिवसांपूर्वी एका वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळून आला. हा टी-१ वाघिणीच्या तीन बछड्यांपैकी एक असून या वाघिणीच्या अन्य दोन बछड्यांची शोध मोहीम राबविण्यात आली. याकरिता नागपुरातून श्‍वानपथक बोलावण्यात आले होते. कर्‍हांडला बीट क्रमांक १४१५ मधील घटनास्थळाच्या चारही बाजुंनी अर्धा किलोमीटर परिसरात शोध घेण्यात आला. मात्र दोन्ही बछड्यांचा पत्ता लागू शकला नसल्याने चिंता वाढल्या आहेत.
उमरेड कर्‍हांडला येथे वाघिणीच्या एका बछड्याचा अर्ध खाल्लेला जबडा आढळून आला होता. या क्षेत्रात टी-१ वाघिणीचे वास्तव्य होते. तिला तीन बछडे होते. दरम्यान, काही दिवसांपासून टी-१ वाघिणीसोबत टी-९ वाघ सूर्या याच्या सहवासात आढळून आला होता. या वाघानेच टी-१ वाघिणीच्या बछड्याची शिकार केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, घटनेनंतर आता टी-१ वाघिणीचे अन्य बछडे सुखरूप आहेत की नाही, याकरिता शोध मोहीम राबविण्यात येत आहे. परंतु, त्यांचा पत्ता लागत नसल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. हे वाघाचे बछडे कर्‍हांडला लगतच्या एफडीसीएम परिसरात असण्याची शक्यता वनकर्मचार्‍यांनी व्यक्त केली.
यावरून या क्षेत्रात १५ पेक्षा अधिक ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले, तरीही बछडे दिसले नाहीत. यानंतर मंगळवारीही शोध मोहीम सुरूच होती. कर्‍हांडला येथील वाघ सूर्या (टी-९) याने सहा वर्षाच्या वाघाच्या बछड्याला मारल्याचा अंदाज आहे. हा मृत वाघ अभयारण्यातील कॉलर लावलेल्या टी-१ वाघिणीचा बछडा आहे. या घटनेनंतर तिचे दोन बछडे बेपत्ता आहेत. या अभयारण्यात मागील चार महिन्यात आतापर्यंत ७ बछडे आणि दोन वयस्क वाघांचा मृत्यू झाला आहे. कर्‍हांडलाचे मुख्य आकर्षण असणारा जय वाघही बेपत्ता आहे.

blank