32.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home मराठवाडा/खान्देश पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कार…!

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कार…!

0
108

औरंगाबाद, दि.22 मार्च- औरंगाबाद ग्रामीण जिल्हयातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी यांना खेळांचे माध्यमांतून स्त्री-पुरूष समानता तसेच कायदयाने व संविधानाने प्रदान केलेले अधिकार व कर्तव्य मुलांच्या मनात रूजवण्यासाठी अभिन्न हा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमांस राष्ट्रीय स्तरावर उपलब्धी मिळाली आहे. पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांना आज Federation of Indian Chambers of Commerce and Industry, New Delhi यांचा [ FICCI SMART POLICING AWARD ] – 2020 या राष्ट्रीय पातळीवरील मानाचा व प्रतिष्ठित पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले आहे. यामुळे औरंगाबाद ग्रामीण पोलीस सह, महाराष्ट्राचे नाव दुस-यांदा राष्ट्रीय पातळीवर गाजले ही आपण सर्वासाठी अभिमानाची बाब आहे. पोलीस दलात पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले जात आहे.