जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत शेतकरी विकास पँनलचा दणदणीत विजय…!

0
66

शेतकरी सहकार बँक विकास पँनलला पाच जागा
औरंगाबाद, दि.24 मार्च-जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत शेतकरी विकास पँनलला 14 जागेवर विजय मिळवत बहुमत मिळाले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे आणि माजी आमदार सुभाष झांबड यांच्या शेतकरी सहकार विकास पँनलला पाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.
शेतकरी विकास पँनलचे विजयी उमेदवार हे आहेत.
संदीपान आसाराम भुमरे, बिनविरोध, अब्दुल सत्तार, नितीन पाटील, जावेद खान शब्बीर खान पटेल, सुहास त्रिंबकराव सिरसाठ, अर्जुनराव बाबुराव गाडे, काळे सुरेखा प्रभाकर, राठोड मनोज महारु, पाटील आप्पासाहेब रामकृष्ण, चव्हाण सतीश भानुदासराव, दानवे अंबादास एकनाथराव, माने मंदाताई अण्णासाहेब, डॉ. गायकवाड सतीश दशरथ, परदेशी दिनेशसिंह पद्मसिंह हे विजयी झाले.
शेतकरी सहकार बँक विकास पँनलचे विजयी उमेदवार….
जगन्नाथ वैजिनाथराव काळे, जाधव पार्वतीबाई रामहरी, पाटील देवयानी डोणगांवकर, किरण अशोकराव पाटील डोणगांवकर बिनविरोध, जैस्वाल अभिषेक जगदीश अपक्ष उमेदवार विजयी झाले आहे.
कोणाला किती मते मिळाली………
प्राथमिक कृषी पतपुरवठा वि.का.सेवा सहकारी संस्था ता.औरंगाबाद या मतदार संघात खान जावेद शब्बीर पटेल यांना 39 मते मिळाली तर शेळके अंकुशराव भगवान यांना 33 मते मिळाली.
प्राथमिक कृषी पतपुरवठा वि.का.सेवा सहकारी संस्था ता.खुलताबाद मधून पाटील किरण अशोकराव बिनविरोध निवडून आले.
प्राथमिक कृषी पतपुरवठा वि.का.सेवा सहकारी संस्था ता.सिल्लोड येथून गाडे अर्जुनराव बाबुराव यांना 63, जांभुळकर विष्णू भिमराव यांना 19.
सोयगाव
काळे रंगनाथ बाबुराव यांना 12, काळे सुरेखा प्रभाकर यांना 22,
कन्नड
मगर अशोक सर्जेराव यांना 39, राठोड मनोज महारु यांना 60 .
पैठण येथून संदीपान आसाराम भुमरे बिनविरोध निवडून आले.
गंगापूर
जाधव शेषराव भावराव यांना 0, कृष्णा पाटील डोणगांवकर यांना 55, साळुंके जयराम नाथुजी यांना 42 मते मिळाली.
वैजापूर
जगताप ज्ञानेश्वर नारायण 44, धुमाळ दत्तात्रय प्रभाकर 1, पाटील आप्पासाहेब रामकृष्ण 68,
बिगरशेती संस्था मतदार संघ…
जगन्नाथ वैजीनाथराव काळे 176,
काळे रवींद्र शिवाजीराव 118, कोलते रंगनाथ धोंडीबा 76, चव्हाण सतिश भानुदासराव 151, जाधव एकनाथ खंडेराव 136, जैस्वाल अभिषेक जगदीश 147, दानवे अंबादास एकनाथराव 160, देशमुख अभिजित भास्करराव 133, पाटील अनिल अंबादास 17, पाटील नितीन सुरेश 176, पाथ्रीकर कैलास सांडु 3, बनकर दिलिप भाऊसाहेब 67, बागडे हरिभाऊ किसनराव 123, शहानवाज खान अ.रहेमान खान 4 मते मिळाली.
कृषी पणन व शेतमाल प्रक्रिया संस्था…
अब्दुल सत्तार अब्दुल नबी 33,
मुथा प्रकाशचंद माणकचंद 7,
शहानवाज खान अ.रहेमान 0
वैयक्तिक सभासद, महिला सदस्य…
जाधव पार्वतीबाई रामहरी 498
डोळस मनिषा सुरेश 6, निकम मीनाताई बन्सीधर 13, बोडखे योगिता दिनेश 14, बोडखे सुरेखा सुरेश 350, माने मंदाताई अण्णासाहेब 573, वाहेगांवकर मंगलाताई अनंतराव 467, शहीदा बेगम शहानवाज खान 3.
अनु.जाती जमाती सदस्य….
डॉ. गायकवाड सतीश दशरथ यांना 598 मते, डोंगरे पवन हिरालाल 398, वाघमारे प्रकाश नामदेव 15.
इतर मागासवर्गीय सदस्य…..
पाटील देवयानी कृष्णा 536, रंधे अंकुश दिगंबर 485.
विमुक्त जाती-भटक्या जमाती, किंवा विशेष मागास प्रवर्ग सदस्य…
परदेशी दिनेशसिंह पद्मसिंह यांना 706 मते मिळाली. शहानवाज खान अ.रहेमान खान 308 मते मिळाली.
एकुण 1014 मते वैध होती. अशी माहिती डि-24 न्यूजला निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मुकेश बारहाते यांनी दिली आहे.