33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home महाराष्ट्र जिल्हा क्षयरोग केंद्राला तीन लाखाचे बक्षीस, आज दिल्लीत पुरस्कार वितरण

जिल्हा क्षयरोग केंद्राला तीन लाखाचे बक्षीस, आज दिल्लीत पुरस्कार वितरण

0
35

कोल्हापूर : ग्रामीण भागात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविल्याबद्दल ‘जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्र, कोल्हापूर ग्रामीण’ला केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयातर्फे तीन लाख रुपयांचे बक्षीस व रौप्यपदक जाहीर झाले आहे. नवी दिल्ली येथे बुधवारी,ता. २४ मार्च रोजी पुरस्कार वितरण होणार आहे. जिल्ह्यातील क्षय रुग्णांच्या संख्येत २०१५ नंतर ४० टक्के घट झाली आहे. या पुरस्कारासाठी देशातील ७२ जिल्हे आणि महाराष्ट्रातील ११ जिल्हे नामांकित झाले होते. केंद्रीय पथकाने कोल्हापूरची पाहणी करुन पुरस्कार जाहीर केल्याचे जिल्हा क्षयरोग निर्मूलन अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांनी सांगितले.

blank