
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाल लवकरच संपणार असून, नवीन सरन्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र सरकारकडून सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव मागविण्यात आलं होतं. त्यानंतर सरन्यायाधाशी बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती एन.व्ही. रमना यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाल पुढील महिन्यात अखेरीस म्हणजे २३ एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नवीन सरन्यायाधीश निवडीची प्रक्रिया सुरू केली होती. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव सूचवण्याची सूचना केली होती. केंद्रीय कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी शुक्रवारी सरन्यायाधीश बोबडे यांना यासंदर्भात पत्र पाठवलं होतं.





