डीएफओसह अप्पर मुख्य वनसरंक्षकाचीही चौकशी करा-फाँरेस्ट रेंजर्स असो.ची मागणी

0
120

आरएफओ दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात

अमरावती,दि.26–मेळघाट व्याघ्रप्रकल्तालीत हरियालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस असलेल्या अधिकार्यावर त्वरीत कारवाई करण्यात यावे अन्यथा फॉरेस्ट रेंजर्स असोस‍िएशन महाराष्ट्र राज्यपातळीवर आंदोलन करेल अशा इशारा प्रधान मुख्य वनसरंक्षक यांना संघटनेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आलेला आहे.निवेदनात द‍िवंगत द‍िपाली चव्हान यांनी त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल मेळघाट व्याघ्रप्रकल्पाचे अप्पर मुख्य वनसरंक्षक श्रीन‍िवास रेड्डी यांना वेळोवेळी होत असलेल्या त्रासाबद्दल अवगत केले. परंतु रेड्डी यांनी त्यांच्या तक्रारीची कोणतीही गंभीर दखल न घेतल्याने आज त्यांना जीव गमवावा लागल्याचे म्हटले आहे.सदर निवेदन राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांनाही पाठविण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष के.व्ही.बोलके,सरचिटणीस एन.आर.गावंडे यांनी दिले असून सोबत दिपाली चव्हाण यांनी मृत्यूपुर्वी लिहिलेल पत्र सुध्दा पाठविण्यात आले आहे.
निवेदनात उपवनसरंक्षक व‍िनोद श‍िवकुमार यांचे व‍िरुद्ध FIR क्र. 0211/2021 कलम 306 अन्वये पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे. तरी सदर प्रकरणी व‍िनोद श‍िवकुमार, उपवनसंरक्षक यांना तत्काळ न‍िलंबीत करण्यात यावे. तसेच त्यांना 7 द‍िवसाच्या आत बडतर्फ करण्यात यावे. त्यांचे व‍िरुद्ध IPC कलम 302, 354 A, 376 C अन्वये सुद्धा फौजदारी कार्यवाही करण्यात यावी. व‍िनोद श‍िवकुमार यांना पाठीशी बालणारे श्रीन‍िवास रेड्डी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प व सदर प्रकरणात जे कोणी वरीष्ठ वनअध‍िकारी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या जबाबदार आहेत. त्या सर्वांची CID मार्फत चौकशी करण्यात यावी.या प्रकरणात सर्व दोषी वनअध‍िकारी यांचे व‍िरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करुन त्वरीत कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल असे म्हटले आहे.
न‍िवेदन सादर करताना अत्यंत दु:ख होत आहे की, द‍िपाली चव्हान वनपर‍िक्षेत्र अध‍िकारी, हर‍ियाल, मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांनी द‍िनांक 25 मार्च 2021 रोजी व‍िनोद श‍िवकुमार उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव यांचे त्रासाला कंटाळुन आत्महत्या केली. याबाबत द‍िवंगत द‍िपाली चव्हान यांनी 4 पानांची सुसाईट नोट सुदधा ल‍िहीलेली आहे.Res. Reddy sir
द‍िपाली चव्हान या वनव‍िभागातील अत्यंत धाडसी, कर्तबगार, न‍िडर अशा वनपर‍िक्षेत्र अध‍िकारी असुन त्यांनी वन व वन्यजीवांचे संरक्षणकरीता आपले ज‍िवाची पर्वा न करता शासकीय कर्तव्य बजावले होते. तसेच द‍िवंगत द‍िपाली चव्हान या प्रेगनंट होत्या. त्यांचे पोटात छोट बाळ असतांना ऐवढे मोठे पाऊल उचलण्याकर‍िता त्यांना त्यांचे वरीष्ठ श्री. व‍िनोद श‍िवकुमार यांनी प्रवृत्त केले. संपुर्ण सुसाईट नोट चे अवलोकन केले असता असे द‍िसुन येते की, श‍िवकुमार उपवनसंरक्षक हे द‍िवंगत द‍िपाली चव्हान यांना व‍िनाकरण आर्थ‍िक व मानस‍िक त्रास देत होते व त्यांचे शारीरीक शोषन करण्याचा सुद्धा त्यांचा मानस द‍िसुन येत असल्याने त्वरीत कठोर कारवाई व्हावी असे म्हटले आहे.