37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News खोब्रामेंढा जंगलात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार

खोब्रामेंढा जंगलात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार

0
62

blank

गडचिरोली- कुरखेडा पोलीस उपविभाग अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीच्या खोब्रामेंढा जंगलात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या नक्षलवाद विरोधी अभियानात आज (सोमवार) सकाळी ७.३० ते ८ या वेळेत झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. यामध्ये नक्षलवाद्यांचा उत्तर गडचिरोली विभागीय समितीचा सचिव २५ लाखांचे बक्षीस असलेला जहाल नक्षली ऋषी रावजी उर्फ पवन उर्फ भास्कर हीचामी (४६), राजू उर्फ सुखदेव बुधेसिंग नेताम (३२), अमर मुया कुंजाम (३०), सुजाता उर्फ कमला उर्फ पूनिता गावडे (३८) व अस्मिता उर्फ सखलु पदा (२८) असे तीन पुरुष व दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकारपरिषदेत दिली. ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये ३ पुरूष व २ महिला नक्षलवादी असल्याची माहिती दिली.शनिवारी सुमारे एक ते दीड तास चाललेल्या या चकमकीत पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. या चकमकीनंतर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.मृत नक्षल्यामध्ये दंडकारण्य स्पेशल झोन कमिटी मेबंर रुषी रावजी ऊर्फ पवन उर्फे भाष्कर हिचामीवर 25 लाखाचे तर सर्व मृत नक्षल्यावर 43 लाखाचे बक्षिस होते.घटनास्थळावरून लॅपटाँपसह मोठ्याप्रमाणात दारुगोळ हस्तगत करण्यात आलेला आहे.blank

तीन वेगवेगळ्या ठिकाणी चकमक
खोब्रामेंढा जंगलात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात एकत्र आले असून ते दरवर्षी नक्षल्यांकडून पाळल्या जात असलेल्या टिसीओसी नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना मिळाली. तेव्हा अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानीया यांच्या नेतृत्वाखाली खोब्रामेंढा, हेटाळकसा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना शनिवार २८ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास जंगलात तीन वेगवेगळ्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षलवाद्यांनी सी-६० जवानांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जवानाच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी सुमारे ६० ते ७० मिनीटे चाललेल्या चकमकीनंतर पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून गेले.

मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त
चकमकीनंतर जंगल परिसरात सी-६० जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळी ठिकठिकाणी रक्ताचे डाग दिसून आले. घटनास्थळी एक ३०३ रायफल मॅग्झीन काडतुसासह, नक्षल पिट्टू, ३ प्रेशर बॉम्ब, नक्षल डांगरी ड्रेस, दोन सोलर प्लेट, वायर बंडल, सुतळी बॉम्ब, तसेच मोठ्या प्रमाणात औषधी साठा व नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वापराचे साहित्य मिळून आले. मिळून आलेल्या ३ नग प्रेशर कुकर बॉम्ब हे बिडीडीएस पथकाच्या साहायाने घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. सी-६० कमांडोच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील,पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतूक केले आहे.

blank