
गोंदिया: – गोंदिया जिल्हा परिसरातील सर्वात मोठे 100 बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सीबीएसई पॅटर्नची 3 मोठे विद्यालय, सह्योग मल्टीस्टेटच्या २१ शाखा कार्यरत आहेत आणि १० नवीन शाखा तयार करण्याचे उद्दीष्ट सह्योग समुहच्या जनहितार्थ चालणार्या या उपक्रमांच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल गरीब लोकांच्या आर्थिक प्रगतीसाठी नियमित प्रयत्न करणे, गरजू लोकांना रोजगार आणि नि: स्वार्थ सेवा देत असलेले सह्योग समुह चे चेयरमेन सत्कारमुर्ती जयेश रामादे यांना संविधान मैत्री संघ तर्फे “रोजगार सेवा रत्न – संविधान मित्र” पुरस्काराने गौरविण्यात आले. हे पुरस्कार 26 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले होते. सत्कारमूर्ती यांच्या वाढदिवसानिमित्त (२९ मार्च) सन्मान प्रतीक व संविधान प्रस्ताविका, साहित्य पुस्तक, संविधान मैत्री संघाचे अतुल सतदेवे, ओबीसी संघर्ष कृती समितीचे रवी भंडारकर, युवा बहुजन मंचचे सुनील भोंगाडे यांच्या हस्ते अगदी साध्या पद्धतीने ससम्मान प्रदान करण्यात आले. यावेळी सह्योग समुहचे चेयरमेन सत्कारमुर्ती जयेशजी यांनी समाजात जनहितार्थ चालणा-या आर्थिक सबलीकरण, व्यवसाय प्रोत्साहन- पाठबळ देण्यासारख्या सामाजिक बहुउद्देशीय उपक्रमांमध्ये सह्योग करण्याचे आश्वासन दिले.