आज गोंदिया 116 ,गडचिरोली 73,वाशिम २०८,भंडारा 566 रुग्ण पॉझिटिव्ह

0
86
गोंदिया,दि.31 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 31 मार्च रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 116 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 92 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली आजपर्यंत 16060 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 15028 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 841 आहे. 666 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 191 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 93.57टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.20 टक्के आहे तर डब्लिंग रेट 380.2 दिवस आहे.
आज 73 नवीन कोरोना बाधित तर 22 कोरोनामुक्त
गडचिरोली दि.31*: आज जिल्हयात 73 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.नवीन 73 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 19, अहेरी 13, आरमोरी 7, भामरागड तालुक्यातील 11 , चामोर्शी 3, धानोरा तालुक्यातील 2, एटापल्ली 1, कोरची 1, कुरखेडा 1, तर वडसा तालुक्यातील 15 जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये पोस्ट ऑफीस जवळ 1, कोटगल 1, स्थानिक 5, मेडिकल कॉलनी 3, पीडब्लूडी कॉलनी 1, पारडी 1, साईनगर 1, लक्ष्मीनगर 1, एसीबी ऑफीस 1, पोलीस कॉलनी 1, गोकुलनगर 1, सोनापुर कॉम्पलेक्स 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 7, स्थानिक 3, नागेपल्ली 3, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये अरसोडा 1, इंदिरानगर बर्डी 1, स्थानिक 4, कृषी उत्पन्न बाजार समिती 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये देऊळगाव 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये आलेवाडा 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, जोगना 1, विकासपल्ली 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ कॅम्प 2, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 10, येरवाडा 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये मारडाकुही 1, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये विसोरा 1, वीरसी 2, सीआरपीएफ कॅम्प 4, भगतसिंग वार्ड 1, कोकडी 1, गांधी वार्ड 2, एमजी विद्यालय 3, आंबेडकर वार्ड 1, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 1 जणांचा समावेश आहे.

वाशिम जिल्ह्यात आणखी २०८ कोरोना बाधित

वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी येथील ५, पाटणी चौक येथील ३, सिव्हील लाईन्स येथील ५, देवपेठ येथील २, गणेशपेठ येथील २, सिंधी कॅम्प येथील १, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील १, महाराणा प्रताप चौक येथील १, गंगू प्लॉट येथील २, पंचशील नगर येथील १, तहसील कार्यालय परिसरातील १, विनायक नगर येथील १, बागवानपुरा येथील १, बाळू चौक येथील १, शुक्रवार पेठ येथील १, विठ्ठलवाडी जवळील १, सुंदरवाटिका येथील १, नालंदा नगर येथील १, लाखाळा येथील १, अल्लाडा प्लॉट येथील २, शहरातील इतर ठिकाणचे २, तोंडगाव येथील १, उकळी पेन येथील ११, सावंगा येथील २२, वाळकी येथील १, कोंडाळा महाली येथील १, देपूळ येथील १, विळेगाव येथील १, जवळा येथील १, काटा येथील २, नागठाणा येथील २, जोडगव्हाण येथील १, मालेगाव शहरातील कुटे वेताळ येथील १, गांधी नगर येथील २, शहरातील इतर ठिकाणचे ९, धमधमी येथील १, उमरदरी येथील १, पिंपळा येथील १, शिरपूर येथील २, वाघी येथील १, तिवळी येथील १, ढोरखेडा येथील १, जऊळका येथील १, वरदरी येथील ३, कोलदरा येथील १, मुंगळा येथील १, हनवतखेडा येथील १, नागरतास येथील १, राजुरा येथील १, कानडी येथील १, दुबळवेल येथील १, कारंजा तालुक्यातील कामठवाडा येथील ४, पोहा येथील २, वडगाव येथील १, पिंपळखेडा येथील ४, नागलवाडी येथील १, टाकळी येथील १, रिसोड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १, शिवाजी नगर येथील १, अनंत कॉलनी येथील २, सिव्हील लाईन्स येथील १, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील २, ग्रामीण रुग्णालय परिसरातील २, शहरातील इतर ठिकाणचे ८, केशवनगर येथील १, रिठद येथील २, नेतान्सा येथील १, केनवड येथील १, गणेशपूर येथील १, निजामपूर येथील २, लिंगा येथील १, वाकद येथील १, तांदूळवाडी येथील १, वाकद येथील १, मोठेगाव येथील १, चिखली येथील १, मसला पेन येथील १, मंगरूळपीर शहरातील जांब रोड परिसरातील १, राधाकृष्ण कॉलनी परिसरातील १, माळीपुरा येथील १, दिवाणपुरा येथील १, हुडको कॉलनी येथील १, ग्रामीण रुग्णालय समोरील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, आठवडी बाजार येथील १, शिवाजी कॉलनी येथील २, शहरातील इतर ठिकाणचे ६, पिंप्री अवगण येथील १, लाठी येथील १, नागी येथील १, शेलूबाजार येथील १, चिंचखेडा येथील ७, कोठारी येथील १, कवठळ येथील २, झडगाव येथील २, हिसई येथील ३, दाभा येथील १, तऱ्हाळा येथील १, शहापूर येथील १, सोनखास येथील १, जांब येथील १, वरुड येथील २, कोळंबी येथील १, मंगळसा येथील १, सावरगाव येथील १, दाभाडी येथील १, वनोजा येथील १, मानोरा तालुक्यातील शेंदोना येथील १, पोहरादेवी येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १ बाधिताची नोंद झाली असून २१० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना पॉझिटिव्ह 566

भंडारा, दि.31 :- जिल्ह्यात आज 123 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 14760  झाली असून आज 566 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 17645 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.65 टक्के आहे. तर जिल्ह्याचा कोरोना रुग्ण मृत्यू दर 01.94 आहे.आज 2141 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 566 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 1 लाख 77 हजार 250 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 17645 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 281, मोहाडी 50, तुमसर 46, पवनी 125, लाखनी 24, साकोली 16 व लाखांदुर तालुक्यातील 24 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 14760 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 17645 झाली असून 2542 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोनाच्या 02 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 343 झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.65 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.94  टक्के एवढा आहे.