ऑनलाईन विस्तार क्रिया “बदलासाठी सक्ती: तरुण लोकांसह एड्स जागरूकता अभियान”

0
21

गोंदिया,दि.01ः- रेड रिबन क्लब (आरआरसी), जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण युनिट (डीएपीसीयू), कुवंर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय,महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी (एमएसएसीएस) गोंदियाच्या संयुक्त विद्यमाने धोटे बंधु विज्ञान महाविद्यालयात सुक्ष्म जिव विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान विभाग YANI एचआयव्ही / एड्स
विषयी जागृती करण्यासाठी “बदलासाठी सक्ती:तरुण लोकांसह एड्स जागरुकता अभियान”या विषयावर
ऑनलाईन विस्तार उपक्रम राबविण्यात आला. प्राचार्य अंजन नायडू,विभाग प्रमुख संजय तिमांडे, जिल्हा
पर्यवेक्षक संजय जेणेकर, मुख्याध्यापक खुशाल उपवंशी,वर्गशिक्षक निरड नागपुरे, रेड रिबन
क्लब (आरआरसी) समन्वयक डॉ. संध्या तांबेकर वंजारी यांनी या विषयावर आँनलाईन मार्गदर्शन केले.रेड रिबन क्लब (आरआरसी) चे सहा प्रशिक्षित सदस्य एचआयव्ही / एड्सच्या कारणास्तव व प्रतिबंधाबद्दल शिकणार्यांचे ज्ञान सुधारू शकतात जेणेकरुन महाविद्यालयीन आणि शाळेच्या आवारात शिक्षक म्हणून काम करु शकतील.एड्सच्या लक्षणांमध्ये वजन कमी होणे,ताप येणे,रात्रीला घाम येणे,थकवा येणे वारंवार होणारे संक्रमण यांचा समावेश आहे. एड्सवर कोणताही उपचार अस्तित्वात नाही,परंतु एआरव्हीचे काटेकोरपणे पालन केल्यास संक्रमणापासून दुय्यम संक्रमणापासून बचाव करता येऊ शकते असे मार्गदर्शन करण्यात आले. ११3 शालेय विद्यार्थी, १२4 आरआरसी सदस्य, मायक्रोबायोलाँजी बायोटेक्नॉलाजी विभागाचे प्रमुख प्रा.संजय तिमांडे, समन्वयक डॉ. संध्या तांबेकर,समुपदेशक प्रकाश बोपचे,रजव
बघेल आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ तृप्ती चंद्रसेन बाजपेयी यांनी सहभागी होत मार्गदर्शन केले.