
सावंतवाडी :- सावंतवाडी पंचायत समिती सभापतीपदी भाजपच्या माजी उपसभापती निकिता सावंत १३ मतांनी विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेच्या रेश्मा नाईक यांना ५ मते पडली. या निवडणुकीत काँग्रेस शिवसेना महाआघाडी दिसून आली. शिवसेनेने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीत बहुमत नसतानाही उमेदवार उभा करून भाजप समोर आव्हान उभे केले.निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार राजाराम म्हात्रे, वासुदेव नाईक , दत्ता गायकवाड उपस्थित होते. यावेळी सदस्य पंकज पेडणेकर, रवी मडगावकर, संदीप नेमळेकर, शीतल राऊळ, प्राजक्ता केळुसकर, मानसी धुरी, सुनंदा राऊळ, गौरी पावसकर, संदीप गावडे, श्रुतिका बागकर, बाबू सावंत, अक्षया खडपे, रुपेश राऊळ, मनीषा गोवेकर, मेघ:श्याम काजरेकर, मोहन चव्हाण उपस्थित होते.