20 वर्षापासून आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने करतात रक्तदान

0
42

पांढराबोडीचे उपसरपंच धुरणभाऊ सुलाखे यांनी केले रक्तदान

पांढराबोडी- रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदान हे महादान आहे. रक्तदानामुळे आज हजारो-लाखो लोकाना जीवनदान मिळते.एका मानवाचेच रक्त दुसर्‍या गरजु मानवाला चालते.आजच्या युगात ते सर्वश्रेष्ठ दान मानले जात आहे. मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान करणे हा एकमेव पर्याय समाजापुढे आहे हे लक्षात घेऊन ग्राम पांढराबोडी येथील कर्तबगार व धडाडीचे, यवकांचे प्रेरणास्त्रोत व लाडके उपसरपंच धुरणभाऊ सुलाखे यानी आज 1 एप्रिल रोजी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोंदिया येथील शासकीय बाई गंगाबाई स्री रुग्णालय गोंदिया येथे रक्तदान केले.मागील 20 वर्षांपासून त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान करण्याचा संकल्प करत आज 20 वेळा रक्तदान करुन समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.राजकारणात राहुन समाजकारणास ते अव्वल दर्जा देतात.दिनदुबळ्याची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. असे ते समजतात.ग्रामीण भागातील परीसरात तसेच शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बाई गंगाबाई स्री रुग्णालयातील उपस्थित सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी धुरणभाऊ सुलाखे म्हणाले की,रक्त केवळ मनुष्याच्या शरीरातच तयार होते याला कोणत्याही वैज्ञानिक प्रयोगशाळेत तयार करता येत नाही. आपण देखील रक्तदान करून एखाद्या गरजवंताची निकड पुर्ण करण्याकरीता पुढे यावे . त्यांच्या सोबत ग्राम पंचायत सदस्य भवन नागपुरे ,जितेद्र ढोमणे, अजय नागपुरे, मुकेश दमाहे ,बंडु भाऊ, नदनी नागपुरे, सह त्याचे सहकारी मित्रमंडळी उपस्थित होते.