गोंदियात 167, गडचिरोली 72 ,रुग्ण पॉझिटिव्ह

0
83
गोंदिया,दि.01 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 01 मार्च रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 167 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 57 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली आजपर्यंत 16227 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 15143 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 893 आहे. 631 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 191 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 93.57टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.20 टक्के आहे तर डब्लिंग रेट 380.2 दिवस आहे.

आज 72 नवीन कोरोना बाधित तर 68 कोरोनामुक्त

गडचिरोली,दि. 1: आज जिल्हयात 72 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 68 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10700 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10123 वर पोहचली. तसेच सद्या 466 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 111 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.61 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 4. 36 टक्के तर मृत्यू दर 1.04 टक्के झाला.
नवीन 72 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 30, अहेरी 8, आरमोरी 03, भामरागड तालुक्यातील 03, चामोर्शी 04, धानोरा तालुक्यातील 07, एटापल्ली 04, कोरची 01, कुरखेडा 04, सिरोंचा 01, तर वडसा तालुक्यातील 07 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 68 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 26, अहेरी 05, आरमोरी 08 भामरागड 06, चामोर्शी 09, धानोरा 01, एटापल्ली 01, वडसा 12 जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये सदगुरुनगर 4, स्नेहानगर 4, गोंडवाना विद्यापीठ जवळ 1, सोनापूर कॉम्पलेक्स 1, कॅम्पएरिया 2, बोदली 1, कलेक्टर कॉलनी 2, पेपरमिल ऑफीस जवळ 1, स्थानिक 2, शिवाजीनगर 1, गोगांव 1, मेडिकल कॉलनी 1, नवेगांव 3 , गोकूलनगर 1, कन्नमवार वार्ड 1, सर्वादय वार्ड 1,रामपूरी वार्ड 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 5, आलापल्ली 2, नागेपल्ली 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये माहुली नगर 3 , कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, खैरी 2, गुरनोली 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये बेळगांव 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये आष्टी 1, स्थानिक 3, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, सीआरपीएफ कॅम्प 1, लेखा 1, स्थानिक 3, कटेझरी 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 03 , एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये बुगीपिपरी 1, उदेरा 2, कानडोडी 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये आमगांव 1, स्थानिक 1, एम.जी. विद्यालय 1, विर्सी वार्ड 1, राजेंद्र वार्ड 2, रामपुरी वार्ड 1, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 2 जणांचा समावेश आहे.