38.6 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा उपलब्ध – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ....

कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा उपलब्ध – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर

0
24

blank

४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी लस घ्यावी

वाशिम, दि. ०2 () :  जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा उपलब्ध असून उद्या, २ एप्रिल रोजी आणखी २० हजार डोस प्राप्त होणार आहेत. जिल्ह्यात ८८ केंद्रांवर लसीकरण सुरु असून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी केले आहे.

जिल्ह्यात लसीकरणासाठी कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन लस उपलब्ध असून या दोन्ही लसी पूर्णतः सुरक्षित असून त्यांचा कोणताही गंभीर दुष्परिणाम जाणवत नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजार पेक्षा अधिक नागरिकांनी ही लस घेतली असून यापैकी कोणालाही गंभीर दुष्परिणाम जाणवलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी मनात कोणतीही भीती न बाळगता किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी. कोरोना संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी ही लस फायदेशीर आहे. १ एप्रिल रोजी सायंकाळच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचे ४ हजार ०२२ डोस उपलब्ध आहेत, तसेच कोव्हॅक्सीन लसीचे सुमारे २० हजार डोस उपलब्ध आहेत. उद्या, २ एप्रिल रोजी कोविशिल्ड लसीचे आणखी २० हजार डोस उपलब्ध होणार आहेत. तसेच यापुढेही नियमितपणे लसीचा पुरवठा सुरु राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी दिली.