धान्य खरेदीचे दिवस वाढवा – सामाजिक कार्यकर्ता राहुल बांते यांची मागणी

0
36

भंडारा: आजही अनेक शेतकऱ्यांचे अर्धेअधिक धान घरी पडून आहेत. धान खरेदीची मुदत ३१ मार्चला संपली आहे. अशातच विविध कारणामुळे अनेक शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. आधीच काेराेनामुळे शेतकरी हवालदिल झाला त्यातच भंडारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस व महापुराने शेतकऱ्यांना वेठीस धरले असून कसाबसा आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता किमान एक महिन्याकरिता आधारभूत धान खरेदी केंद्रातून धान खरेदी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता राहुल बांते यांनी केली आहे.
जिल्ह्यातील धान्य खरेदी केंद्र दरवर्षी १० ऑक्टोंबर पासून सुरु करण्यात येत होती. तीच शासकीय धान्य खरेदी केंद्र या वर्षी ऑक्टोबर महिन्यात चालू न होता एक महिना उशिरा नोव्हेंबर मध्ये चालू करण्यात आली. शासन निर्णयानुसार ३१ मार्चपर्यंत शासकीय गोदामात धान्य खरेदी करण्याची अंतिम तारीख असते. परंतु यावर्षी कधी बारदाना अभावी तर कधी मोजलेल्या मालाची उशिरा उचलनी यामुळे होणारे हाऊसफुल गोडाऊन च्या अभावी धान्य खरेदी केंद्र बंद राहत होती. त्यामुळे जिल्ह्यातील २५ ते ३० टक्के शेतकरी धान्य मोजण्या पासून दूर राहिले आहेत. त्यामुळे शाशनाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर धान खरेदीची मुदत वाढवून देण्यात यावी असी मागणी भंडारा येथील सामाजिक कार्यकर्ता राहुल बांते यांनी केली आहे.