
गोंदिया- उडान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र , धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय , गोंदिया द्वारे एक दिवसीय “ स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचा मार्ग” विषयावर मार्गदर्शन व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन ४ एप्रिल २०२१ रोजी वेबिनार द्वारे करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उदघाटक डाँ. अंजन नायडू, प्राचार्य धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय , गोंदिया, मुख्य मार्गदर्शक मा. डाँ अभय शेंडे , आई.आर..एस. उपसंचालक, आयकर , नागपूर आणि कार्यक्रमाचे संयोजक प्रा. धर्मवीर चौहान यांच्या उपस्थितीत या वेबिनारचा उदघाटन सोहळा संपन्न झाला.
आपल्या उद्घाटकीय भाषणात डाँ. अंजन नायडू यांनी विद्यार्थ्यांना संबोधीत केले कि, स्वप्न मोठी पहा -जर आपणास गगन भरारी घ्यायची असेल तर पूर्वी आकाशात झेप घेण्याचे धाडस व तसेच स्वप्न बघणे महत्वाचे. आपण जर आपल्या स्वप्नांना परिश्रमाची जोड दिली व सातत्याने परिश्रम केले तर यश निश्चितच मिळेल. आपली ग्रामीण पृष्ठभूमी , आपली आर्थिक स्थिती कधीच यश मार्गात रोडा बनूच शकत नाही , म्हणून हा न्यूनगंड बाजूला सारा व जोमाने तयारीला लागा हा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. धर्मवीर चौहान यांनी सादर केले. आपल्या प्रास्ताविकात प्रा. धर्मवीर चौहान यांनी उडान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उद्देदेश व उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मा. डाँ अभय शेंडे , यांनी आपल्या मार्गदर्शनाच्या प्रारंभिक सत्रात विद्यार्थ्यांनी नागरी सेवेचा मार्ग का निवडावा या विषयावर मार्गदर्शन केले. नागरी सेवेत जायचे असेल तर तशी स्वप्ने आधी बघावी लागतील. स्वप्न बघणे हे यश मार्गाचे उगम स्थान आहे असे ते म्हणाले. काही विद्यार्थी हे तडजोड करतात, हि तडजोड स्वप्नाची पण असते पण विद्यार्थ्यांनी तडजोड करू नये तर त्यांनी स्वप्ने मोठी पाहावी. आपण जर ज्ञानाने परिपक्व असाल तर निश्चितच आपण परिवार, समाज घडविण्याचे कार्य करू शकत हा संदेश दिला. त्यांनी पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी कशी, वेळेचे नियोजन कसे करावे तसेच इंग्रजी भाषेवर प्रभुत्व कसे मिळवावे यावर मार्गदर्शन केले. तसेच तयारी करत असतांनी विद्यार्थी कोणत्या चुका करतात व त्या का टाळाव्यात यावर मार्गदर्शन केले. आपल्या सुरुवाती सत्रात त्यांनी अधिकारी बनण्यापर्यंतचा त्यांचा खडतर प्रवास उपस्थितांना सांगितला तसेच अधिकारी वर्गावर असणाऱ्या जबाबदाऱ्या कोणत्या असतात व त्या जबाबदाऱ्या पेलण्या साठी व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे अभ्यासू असणे गरजेचे आहे हे सांगितले. या परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम करण्याची गरज आहे. त्यानी आपल्या मार्गदर्शनात नागरी सेवा परीक्षे वर विस्तृत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संयोजक , उडान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. धर्मवीर चौहान यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तसेच कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक यांचा परिचय व आभार प्रदर्शन केले.
हे मार्गदर्शन शिबिर झूम मीटिंग अप्लिकेशन आणि युट्यूब थेट प्रवाहावर घेण्यात आले. या मार्गदर्शन व्याख्यान माले मद्धे १०० विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाँ . अंजन नायडू यांच्या मार्गदर्शनात प्रा. संजय तिमांडे , डाँ . दिलीप चौधरी व कार्यक्रमाचे संयोजक प्रा. धर्मवीर चौहान आणि सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.





