
नवी दिल्ली(वृत्तसंस्था)- अनिल देशमुख यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर देशमुख तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. सीबीआय चौकशी टाळता यावी यासाठी त्यांनी दिल्लीत ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत रात्री नऊ ते दहा दरम्यान चर्चा केली. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर या घडामोडी घडल्या.
मीडिया रिपोर्ट्सनुसार सीबीआय चौकशी टाळण्यासाठी अनिल देशमुखांनी दिल्लीला रवाना झाले. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेतली. यावेळी राज्य सरकारचे सुप्रीम कोर्टातले वकील राहुल चिटणीस आणि एक वकिलांची टीमही या ठिकाणी हजर होती. हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता यानंतर काय करता येईल याविषयीवर या बैठकीत चर्चा झाली. आता यानंतर त्यांचे पुढचे पाऊल काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





