41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News राज्य सरकारचा मोठा निर्णय! ११ एप्रिल रोजी होणारी MPSC ची परीक्षा पुढे...

राज्य सरकारचा मोठा निर्णय! ११ एप्रिल रोजी होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलली!

0
60

blank

मुंबई,दि.09ः येत्या ११ एप्रिल रोजी होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामधून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी देखील गेल्या आठवड्याभरापासून सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष रस्त्यावर या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता परीक्षार्थींच्या सुरक्षेसाठी सरकारने हा निर्णय घावा, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी दीडच्या सुमारास बोलावलेल्या तातडीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षा नंतर कधी घेतल्या जातील, त्याविषयी देखील निर्णय झाल्यावर कळवण्यात येईल, असं देखील या बैठकीत ठरल्याचं सांगितलं जात आहे.

blank