
औरंगाबाद, दि.10 एप्रिल– सध्या कोरोना संसर्ग राज्यात झपाट्याने वाढ होत आहे. हजारो रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोविड-19 रुग्णांना रक्ताचा तुटवडा होत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत हिना नगर, रशिदपूरा येथे एमराल्ड एज्युकेशनल अँण्ड वेलफेअर सोसायटीच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन आज करण्यात आले होते. जिल्हाधिकारी, मनपा प्रशासक यांनीही रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. संस्थेचे अध्यक्ष सैय्यद अहमद मोहीयोद्दीन, सचिव सैय्यद तनवीर, कोषाध्यक्ष सैय्यद हुसेन, फाऊंडर मेंबर सय्यद नाहिद, सैय्यद नबील यांनीही यावेळी रक्तदान केले. यावेळी वार्डाचे माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी, शोएब सिद्दीकी, कैसर बाबा, हाफिज अकील अहेमद, अब्दुल अजीज, शकील भाई, फय्याज अहेमद, सैय्यद जफर अली, शायक मतीन, एम.डि.तय्यब, शेख आसिफ, हाफीज नदीम, शेख कासिफ आदी यावेळी उपस्थित होते.





