42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home महाराष्ट्र अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी संजय पांडे

अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी संजय पांडे

0
56

blank

मुंबई-वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे महासंचालक संजय पांडे यांची राज्याच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले.
हेमंत नगराळे यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक रजनीश सेठ यांना राज्याच्या महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. आता त्या जागी पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील महिन्यात झालेल्या बदलीसत्रात संजय पांडे यांना राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली होती. पांडे यांच्या जागी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांची गृहरक्षक विभागात नियुक्ती करण्यात आली. या बदल्यांमुळे नाराज झालेले पांडे यांनी सुटीवर जाण्याचा निर्णय घेतला होता तसेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. सेवा ज्येष्ठतेनुसार आपल्यावर अन्याय झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. वरिष्ठ पदांवरील बदल्या व नियुक्त्या करताना पोलिस महासंचालक पदासाठी आवश्यक सेवा ज्येष्ठतेकडे दुर्लक्ष केले गेले. सरकारची ही कृती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाही, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता त्यांच्याकडे महाराष्ट्र पोलिस अतिरिक्त महासंचालक पद सोपवण्यात आले आहे.

blank