33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home रोजगार/व्यापार “धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात राज्य सेवा स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन

“धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात राज्य सेवा स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन

0
37

blank

गोंदिया,दि.11ः- उडान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र , धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय , गोंदिया द्वारे एक दिवसीय “ राज्य सेवा स्पर्धा परीक्षेची तयारी ” विषयावर मार्गदर्शन व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन ११ एप्रिल रोजी वेबिनार द्वारे करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उदघाटक प्राचार्य डाँ. अंजन नायडू, धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय गोंदिया, मुख्य मार्गदर्शक डाँ सचिन पानझाडे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद , भंडारा , आई क्यू ए सी समन्वयक -डाँ . दिलीप चौधरी आणि कार्यक्रमाचे संयोजक प्रा. धर्मवीर चौहान यांच्या उपस्थितीत या वेबिनारचा उदघाटन सोहळा संपन्न झाला.
महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती दीना निमित्त सर्वप्रथम अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आपल्या उद्घाटकीय भाषणात डाँ. अंजन नायडू यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. विद्यार्थ्यांकडे वचनबद्धता, कठोर परिश्रम आणि समर्पण असणे आवश्यक आहे. मोठी स्वप्ने बघून विद्यार्थ्यांनी परिश्रम केले तर यशाचे शिखर गाठणे शक्य होते असं ते म्हणाले.
आई क्यू ए सी समन्वयक -डाँ . दिलीप चौधरी यांनी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती उपष्ठीतांना करून दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. धर्मवीर चौहान यांनी सादर केले. आपल्या प्रास्ताविकात प्रा. धर्मवीर चौहान यांनी उडान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उद्देदेश व उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मा.डाँ सचिन पानझाडे , यांनी आपल्या मार्गदर्शनात “ राज्य सेवा स्पर्धा परीक्षेची तयारी ” या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाचे संयोजक , उडान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. धर्मवीर चौहान यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तसेच कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक यांचा परिचय व आभार प्रदर्शन केले.
हे मार्गदर्शन शिबिर झूम मीटिंग अप्लिकेशन आणि युट्यूब थेट प्रवाहावर घेण्यात आले. या मार्गदर्शन व्याख्यान माले मद्धे २०० विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाँ . अंजन नायडू यांच्या मार्गदर्शनात प्रा. संजय तिमांडे , डाँ . दिलीप चौधरी व कार्यक्रमाचे संयोजक प्रा. धर्मवीर चौहान आणि सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

blank