33.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home Top News कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता सुक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री नवाब मलिक

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता सुक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री नवाब मलिक

0
36

blank

 गोंदिया व सडक/अर्जुनी रुग्णालयामध्ये भेट

गोंदिया, दि 3: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता खाटांची उपलब्धता, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व औषधांचा साठा उपलब्धतेबाबत सुक्ष्म नियोजन करा, असे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
काल जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपूडे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत तुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, एफडीए अधिकारी संदीप नरवनेआदी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता उपलब्ध खाटांची संख्या वाढविण्यात यावी. यासाठी प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात अतिरिक्त खाटा उपलब्ध करुन त्या ठिकाणी पुर्णवेळ ॲम्बुलन्स ठेवावी, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या. रुग्णालयामध्ये डॉक्टरांची कमतरता असेल तर वैद्यकीय क्षेत्रात अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरित करून कोविड काळात त्यांची सेवा घ्यावी, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
1 मे पासून 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले असून लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी होऊ नये म्हणून प्रत्येक लसीकरण केंद्राच्या क्षेत्रानुसार कॉल सेंटर सुरू करावे व लाभार्थ्यांची नोंदणी करावी. लाभार्थ्यांना एसएमएसव्दारे लसीकरणाची तारीख व वेळेची माहिती देण्यात यावी त्यामुळे लसीकरण केंद्रावरील अनावश्यक गर्दी टाळता येईल, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
जिल्हा क्रीडा संकूल गोंदिया येथे 110 खाटांची क्षमता असलेल्या डेडिकेटेट कोविड सेंटरचे फित कापून पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अद्याप 40 वातानुलीत खाटांच्या क्षमतेचे काम प्रस्तावित आहे. सोबतच 5 ॲम्बुलन्स व 3 अग्निशमन वाहनांना पालकमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण सुद्धा यावेळी करण्यात आले.

सडक/अर्जुनी व गोंदिया रुग्णालयाची पाहणी

ग्रामीण रुग्णालय सडक/अर्जुनी, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा क्रीडा संकूल येथील कोविड केअर हॉस्पिटलला पालकमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली. उपचार घेत असलेल्या रुग्णांना देण्यात येत असलेल्या सोई सुविधांचा आढावा त्यांनी या भेटीत घेतला. रुग्णांना नियमित उपचार द्यावे, जेवणाचा दर्जा उत्तम असावा, स्वच्छता ठेवावी व रुग्णांचे समुपदेशन, योगा इत्यादी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे त्यांनी या भेटीत सांगितले. यावेळी सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालय येथे लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला. आमदार सर्वश्री अभिजीत वंजारी, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रीकापूरे, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, माजी आमदार राजेंद्र जैन, नगराध्यक्ष अशोक इंगळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रशांत तुरकर, नगरपरिषद मुख्याधिकारी करण चव्हाण, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, तहसिलदार आदेश डफळ, अपर तहसिलदार अनिल खडतकर, बाई गंगाबाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सागर सोनारे उपस्थित होते.

blank