34.5 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home महाराष्ट्र फलोत्पादन पिकांनाही हवे विम्याचे संरक्षण-कृषी मित्र पुरस्कार प्राप्त शेतकरी टेंभरे यांची मागणी

फलोत्पादन पिकांनाही हवे विम्याचे संरक्षण-कृषी मित्र पुरस्कार प्राप्त शेतकरी टेंभरे यांची मागणी

0
33

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्रापैकी ९० हेक्टर क्षेत्राच्या वर आजही धान पिकाची लागवड करण्यात येते. मात्र याला बगल देत काही वर्षापासून जिल्ह्यात अनेक शेतकरी फलोत्पादन शेतीकडे वडले आहेत. परंतु निसर्गाच्या अवकृपेने येणार्‍या संकटामुळे अनेक शेतकर्‍यांचे नुकसान होत असून या नुकसानीच्या धास्तीने शेतकरी फलोत्पादन पिकाकडे वडत नाही. परिणामी आर्थिक नुकसानही सहन करावा लागतो तेव्हा शासनाने गोंदिया व भंडारा जिल्ह्यात फलोत्पादन पीकही पीक विम्यात समाविष्ट करावे, अशी मागणी चुटियाचे कृषी मित्र पुरस्कार प्राप्त शेतीनिष्ठ शेतकरी ऋषी टेंभरे यांनी केली आहे.
गोंदिया जिल्ह्यात २ लाख २० हजार लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे १ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रात शेतकरी धान पिकाचे उत्पादन घेतात. विशेष म्हणजे खरीप हंगामात धान पिकाचे उत्पादन अधिक होते. तर रब्बी हंगामात ६० हजाराच्यावर धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. उर्वरित लागवडीखालील जमीत फलोत्पादक शेतीत ज्यामध्ये पपई, आंबा, केळी, चिकू यासह भाजीपाला लागवडीखालील क्षेत्रात काकडी, वांगे, टमाटर, मिर्ची आदी पिकेही घेतली जातत. यासह ज्वारी व ऊस लागवडही करण्यात येते. मात्र केंद्र शासनाने पीक विमा संरक्षण क्षेत्रात गोंदिया व भंडारा जिल्ह्यात फक्त पीक विमा धान पिकाला लागू राहिल, असा उल्लेख केल्याने इतर पिकांना पीक विम्याचा लाभ मिळत नाही. आजघडीला जिल्ह्यात अनेक प्रगतीशिल शेतकरी, केळी, पपई, आंबा आदी पिकांचे उत्पादन घेतात. मात्र जिल्ह्यात निसर्गाची अवकृपा होत असल्याने या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. नुकसान झाल्यानंतर शेतकर्‍यांना शासनाकडून कोणतीही मदत मिळत नाही. परिणामी शेतकरी आर्थिक डबघाईस येतो. याच कारणास्तव अनेक शेतकरी इच्छा राहूनही फलोत्पादन शेतीकडे वडत नाही. तेव्हा केंद्र शासनाने फलोत्पाद अंतर्गत येणार्‍या पिकांनाही पीक विम्याचे संरक्षण द्वावे, अशी मागणी ऋषी टेंभरे यांनी केली आहे.