
मुंबई, दि.17 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक सरळसेवा परीक्षा-2018 आणि खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2017 मधील पात्र एकूण 737 उमेदवारांना जून-2021 पासून नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे मुलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
खात्यांतर्गत पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2017 मधील 322 उमेदवारां
सदरचे प्रशिक्षण हे कोरोना परिस्थितीच्या अधिन राहून तसेच राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या कोरोना मार्गदर्शक तत्वांच्या अधिन राहून सुरु करण्यात येतील असेही, श्री.वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.





