37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home रोजगार/व्यापार ‘सकारात्मकता एक जादु’यावर 19 मे रोजी डॉ. हेमा सोमानी यांचे ऑनलाइन मार्गदर्शन

‘सकारात्मकता एक जादु’यावर 19 मे रोजी डॉ. हेमा सोमानी यांचे ऑनलाइन मार्गदर्शन

0
23

वाशिम, दि.18 : सध्या कोरोना संसर्गाचा काळ आहे. कोरोना काळात सकारात्मकता एक जादुई औषध म्हणून कसे कार्य करते आणि सकारात्मक कशी आत्मसात करावी, या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वाशिमच्या वतीने ‘सकारात्मकता एक जादु’ या विषयावर 19 मे रोजी दुपारी 12 ते दुपारी 1 या वेळेत इनरव्हिल तथा लायन्स क्लब ऑफ वाशिमच्या माजी सचिव तसेच बेटी पढाओ मंडळाच्या उपाध्यक्ष डॉ. हेमा सोमाणी यांचे ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या वेबिनारमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी  https://meet.google.com/dpc-wxpr-ikq  या लिंकवर क्लिक करून या सत्रात सहभागी व्हावे. वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये गुगल मिट ॲप यापूर्वी इन्स्टॉल केलेला नसेल तर इन्स्टॉल करुन घ्यावा.आपण गुगल मिट ॲपमधून कनेक्ट झाल्यानंतर आस्क टू जॉईनवर क्लिक करावे. सदर सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी दहा मिनिट वेळेपूर्वी जॉईन करावे. दिलेल्या लिंकमधुन कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हिडिओ व माईक बंद करावा. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक अनम्युट सुरू करून विचारावे व लगेच माईट बंद करण्याची दक्षता घ्यावी. प्रश्न विचारताना मोजक्या शब्दात विचारावे.

या ऑनलाईन वेबिनारचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक – युवतींनी सहभागी होऊन लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजक मार्गदर्शन  केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी केले आहे.

blank