41.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home राजकीय तीन दिवसात सुरु होणार रब्बीची धान खरेदी प्रफुल्ल पटेल : छगन भुजबळ...

तीन दिवसात सुरु होणार रब्बीची धान खरेदी प्रफुल्ल पटेल : छगन भुजबळ यांच्यासह अधिकाऱ्यांशी केली चर्चा

0
50

blank

गोंदिया : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान खरेदी त्वरित सुरु व्हावी यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी (दि.१८) अन्न व नागरी पुरवठा छगन भुजबळ यांच्याशी व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा केली. त्यात येत्या तीन दिवसात रब्बीतील धान खरेदीला सुरुवात करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांना दिले.

रब्बी हंगामातील धान खरेदीचा तिढा सोडून त्वरित धान खरेदीला सुरुवात व्हावी आणि शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासंदर्भात मंगळवारी (दि.१८) मंत्रालयात या विषयावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित बैठक पार पडली. बैठकीला खा. प्रफुल्ल पटेल, आदिवासी विकास व अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव, मार्केटिंग फेडरेशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत रब्बी हंगामातील धान खरेदी त्वरित सुरु करण्यात बाबत चर्चा करण्यात आली. खा. प्रफुल्ल पटेल यांनी खरीप हंगाम तोंडावरुन असून अद्यापही जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाचे धान खरेदी केंद्र सुरु झाले नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. रब्बीतील धानाची कापणी आणि मळणी देखील पूर्ण होत आली आहे. अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यांवर आहे. शेतकऱ्यांना खरीपासाठी बियाणे, खते आणि मशागतीची कामे करण्यासाठी पैशाची गरज आहे. मात्र या दोन्ही विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे शेतकरी कोंडीत सापडला आहे. त्यामुळे या दोन्ही विभागाने त्वरित धान खरेदी केंद्र सुरु करण्यास सांगितले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सुध्दा त्वरित धान खरेदी सुरु करण्याचे निर्देश दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यावर अधिकाऱ्यांनी तीन दिवसात केंद्र सुरु करण्याचे आश्वासन बैठकीत खा. प्रफुल्ल पटेल यांना दिले