33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता पालडोंगरी येथील नाल्याच्या काठावरून 70 हजारांचा सडवा मोहरसायन जप्त

पालडोंगरी येथील नाल्याच्या काठावरून 70 हजारांचा सडवा मोहरसायन जप्त

0
40

blank

तिरोडा, दि.23 : ग्राम पालडोंगरी येथील नाल्याजवळ हातभट्टीची दारू गळून विक्रीचा व्यवसाय होत असल्याची गोपनीय माहिती तिरोडा पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी नाल्याजवळील परिसराची पाहणी व तपासणी करून 87 प्लास्टीक पोतींमध्ये प्रत्येकी 10 किलोप्रमाणे 69 हजार 600 रुपये किंमतीचा अवैध सडवा मोहरसायन जप्त करण्यात आला. यात एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आले. ही कारवाई शनिवार, 22 मे रोजी सकाळी 7.30 ते 8.30 वाजताच्या दरम्यान करण्यात आली.

सविनय वृत्त असे की, सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर हणवते हे पोलीस शिपाई सनोज सपाटे, जोगदाड व अंबुले यांच्यासह आज 22 मे रोजी परिसरात पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान गोपनीय सूत्रांनी माहिती दिली की, ग्राम पालडोंगरी नाल्याजवळ आरोपी अमिन सय्यद (वय 25) रा. संत रविदास वॉर्ड, तिरोडा हा हातभट्टीची दारू गाळून विक्रीचा व्यवसाय करीत आहे. या माहितीवरून दोन पंचांना सोबत घेऊन पोलीस पालडोंगरी नाल्याजवळ गेले. त्यावेळी नाल्याच्या बाजूला काठावर सडवा मोहापास आढळून आला. सदर अवैध माल कोणाचा आहे, याबाबत पोलिसांनी शेजारील शेतकर्‍यांना विचारपूस केली. दरम्यान सदर माल अमीन शपी शेख रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा याचा असल्याचे असे सांगण्यात आले.

पंचासमक्ष नाल्याच्या काठावर पाहणी दरम्यान 87 प्लास्टीक पोतडीत प्रत्येकी 10 किलोप्रमाणे 870 किलो सडवा मोहापास रसायन प्रती किलो 80 रुपये याप्रमाणे 69 हजार 600 रूपयांचा माल अवैधरीत्या मिळून आला. तो पंचासमक्ष कायदेशीररीत्या ताब्यात घेण्यात आला. तसेच जप्त मालपैकी एका 180 एमएल काचेच्या बाटलीत सडवा मोहारसायन वेगळा काढून पंचांना वास देवून खात्री झाल्यावर तो सी.ए. सॅम्पलकरिता सीलबंद करून ताब्यात घेण्यात आला. तसेच उर्वरित सडवामोहापास साधनाअभावी नष्ट करण्यात आला.सदर प्रकरणात आरोपी अमीन शफी शेख याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी थनेदार ईश्वर हणवते, पोलीस शिपाई सनोज सपाटे, जोगदाड व अंबुले आदींनी केली.

blank