33.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्ह्यात नवे 149 कोरोना बाधित

गोंदिया जिल्ह्यात नवे 149 कोरोना बाधित

0
84
गोंदिया,दि.24 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून
आज 24 मे रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 149 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 130 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातील कोरोना बाधित 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आजपर्यंत 40306 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 38906 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 731 आहे. 348 क्रियाशील असलेले बाधित रुग्णघरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 669 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 96.56 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.62 टक्के आहे तर डब्लिंग रेट 51 दिवस आहे.