आज 25 मे रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 74 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 111 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातील कोरोना बाधित 6 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आजपर्यंत 40380 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 39017 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 688 आहे. 389 क्रियाशील असलेले बाधित रुग्णघरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 675 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 96.62 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.62 टक्के आहे तर डब्लिंग रेट 51 दिवस आहे.
गडचिरोली जिल्ह्यात 235 कोरोनामुक्त, 2 मृत्यूसह 143 नवीन कोरोना बाधित
गडचिरोली,दि.25: आज जिल्हयात 143 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 235 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 28906 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 26687 वर पोहचली. तसेच सद्या 1520 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 699 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 2 नवीन मृत्यूमध्ये 71 वर्षीय पुरुष विसापूर गडचिरोली, 68 वर्षीय पुरुष व्याहाड ता.सावली जि.चंद्रपूर याचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.32 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 5.26 टक्के तर मृत्यू दर 2.42 टक्के झाला.
नवीन 143 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 39, अहेरी तालुक्यातील 25 आरमोरी 5, भामरागड तालुक्यातील 0, चामोर्शी तालुक्यातील 30, धानोरा तालुक्यातील 6, एटापल्ली तालुक्यातील 9, कोरची तालुक्यातील 2, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 5, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 7, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 11 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 4 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 235 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 69, अहेरी 36, आरमोरी 18, भामरागड 03, चामोर्शी 42, धानोरा 10, एटापल्ली 5, मुलचेरा 7, सिरोंचा 16, कोरची 3, कुरखेडा 5 तसेच वडसा येथील 21 जणांचा समावेश आहे.





