# दुसरा व तिसरा टप्प्यातील निधी ठप्प
# शासनाची अडवणूक लाभार्थ्यांना वेठीस
आमगाव:- केंद्र सरकारच्या घरकुल योजनेतून मिळालेलं घर बांधकाम निधी राज्यशासनाच्या तुघलकी कारभारामुळे लाभार्थ्यांना वेठीस धरले आहे. घर बांधकाम निधी अभावी अडल्यामुळे पावसाळ्यात उघड्यावर पडण्याची पाळी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांवर आली आहे.
केंद्र व राज्यसरकार यांच्या मदतीने पंतप्रधान घरकुल योजना नागरिकांसाठी सार्थक ठरली आहे. या योजनेतून जिल्ह्यातील ग्रामीण भागात सदर योजनेतून मोठ्या प्रमाणात योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. या बांधकामाचे लाभार्थ्यांनी सुरवात केली . प्रशासनाने या बांधकामावरील पहिला टप्पा निधी लाभार्थ्यांना मंजूर करून दिले, त्यामुळे लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामाचे निधी लवकर मिळत असल्यामुळे उधार उसने घेऊन संपूर्ण घरकुल बांधकाम पूर्ण करून घेतले ,तर याच बांधकामात काहींनी पावसाळ्यात शेती नियोजनातील राखून ठेवलेला निधी ही खर्च करून घेतले त्यामुळे घरकुल बांधकामाचे नियोजन फसले आहे.यात मात्र लाभार्थ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
सामान्य जनतेला हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाकडून एक लक्ष एक्कावन हजार चारशे सव्वीस रुपये अनुदान देण्यात येत आहे.घरकुल बांधकाम ऍग्रिमेंट झाल्यावर संबंधीत विभाग लाभार्थ्यांना वीस हजाराचे अनुदान देते ,त्यानंतर टप्प्याटप्प्याने निधी मंजूर करून देण्यात येत असते,परंतु घरकुल बांधकामावरील कामे पूर्ण होऊन सुद्धा अनुदान मिळत नसल्यामुळे लाभार्थ्यांना आथिर्क अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
# शासनाने त्वरित निधी द्यावे
तालुक्यातील जनतेने पंतप्रधान घरकुल योजनेतून घराचे बांधकाम केले.स्वताच्या शेती नियोजनातील जमा रक्कम खर्चून घर बांधकाम पूर्ण केले आता शेतीचे नियोजन आर्थिक अडचणीमुळे थांबले आहे.लाभार्थ्यांना शासनाने त्वरित अनुदान द्यावे अशी मागणी चिळचाळबांध गाव उपसरपंच सुधीरभाऊ पटले यांनी केली आहे.





