
पवनी-अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पवनीच्या वतीने जनजागृती करून गावातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणी फवारणी करण्यात आली अभाविप वतीने 29 मे पासून पवनी येथे बँक, एटीएम, खासगी रुग्णालय, मेडिकल , कृषी केंद्र ,बाजार समिती, गर्दीच्या ठिकाणी फवारणी करण्यात आली. व लोकांमधे सकारात्मक दृष्टिकोन पसरवण्यात आला. आजपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्याची स्थिती लक्षात घेऊन सानीटायझर फवारणी ला सुरुवात करण्यात आली. व त्यावेळेस अड्याळ – पवनी भाग संयोजक व प्रांत कार्यकारिणी सदस्य स्नेहांकित गोटाफोडे , पवनी नगरमंत्री व विदर्भ प्रांत विद्यार्थिनी सहप्रमुख वैदेही पोर्लिकर , पवनी नगरसहमंत्री निकिता बावनकर,महाविद्यालय सहप्रमुख रितेश झगडू, सोशल मीडिया प्रमुख रोहन हटवार, कोश प्रमुख साहिल चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख निशांत शिवरकर, नगर कार्यकारणी सदस्य हिमांशू थोटे, तुषार बावनकर, कृपाली चौधरी, मंगेश कुंभारे, हिमांशू बावनकर, योगेश बावनकर, संघर्ष अवसरे, विनीत मेश्राम,युगल सोनकुसरे हे सेवाकर्याला उपस्थित होते.