खळबंदा-कारूटोला-दवनीवाडा रस्ता बांधकाम; आमदार रहांगडाले यांच्या हस्ते भूमिपूजन

0
33

तिरोडा, दि.4 : खळबंदा-कारूटोला हा रस्ता मागील अनेक वर्षांपासून उखडला होता. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून तशा नागरिकांच्या तक्रारीसुद्धा होत्या. ही बाब लक्षात घेऊन आमदार विजय रहांगडाले यांनी खळबंदा-कारूटोला-दवनीवाडा रस्ता बांधकामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत 313.53 लाखांचा निधी मंजूर करवून घेतला.

खळबंदा-कारूटोला रस्त्याचे बांधकाम मागील अनेक वर्षापासून प्रलंबित होते. यासाठी अनेक लोकप्रतीनिधींनी आश्वासने दिली, भूमिपूजनसुद्धा केले, परंतु काम सुरु झाले नाही. सदर रस्त्याबाबत परिसरातील जनतेने तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांना माहिती दिली. याची तात्काळ दखल घेवून त्यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत खळबंदा-कारूटोला-दवनीवाडा या 2.63 किमी रस्त्याकरिता 313.53 लाखांचा निधी मंजूर करवून घेतला. तसेच या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार रहांगडाले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले असून कामाला सुरुवात होणार आहे.
या वेळी प्रामुख्याने भाजपा दवनीवाडा मंडळ अध्यक्ष धनेंद्र अटरे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे, जिल्हा सचिव अजाब रिनाईत, खळबंदा सरपंच सुकवंता तुरकर, विजय पिपरेवार, युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण बोपचे, मंडळ किसान मोर्चा अध्यक्ष नेहरू उपवंशी, माजी पं.स. सदस्य हितेंद्र लिल्हारे, भाजप मंडळ महामंत्री बंटी श्रीबांसरी, कैलाश गौतम, संघटक राजेश उरकुडे, उपसरपंच सुभाष साठवणे, महेंद्र कटरे उपस्थित होते.