
✒️@ ई-मेल द्वारे जिल्हा अधिकारी यांना निवेदन
कोसमतोंडी:-(महेंद्र टेंभरे):– तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्था अर्जुनी मोरगाव यांचे मालकीचे एक हजार मेट्रिक टन क्षमता असलेले धान्य गोदाम हाॅटेल व्यावसायिकाला भाड्याने दिले असल्याने धान खरेदी साठी अडचण होत आहे.हाॅटेल व्यावसायिकाला भाड्याने दिलेले गोदाम परत घेऊन त्याठिकाणी तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात यावे.आणि या प्रकरणात कारवाई करण्यात यावी यासाठी ई-मेल द्वारे निवेदन यशवंत परशुरामकर यांनी निवेदन दिले आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील रब्बी हंगामाचे धान एक महिन्यापासून विक्रीकरीता तयार झाले आहे, तालुक्यात जिल्हा पणन अधिकारी यांचे माध्यमाने चालविण्यात येणाऱ्या एकुण दहा केंद्रापैकी सहा केंद्र हे सहकारी खरेदी विक्री संस्था अर्जुनी मोरगाव यांचे माध्यमातून चालविले जातात.परंतू तालुका खरेदी-विक्री संस्थेकडून एकाही केंद्रावर स्वत: च्या गोदामांची व्यवस्था नाही.अर्जूनी मोरगाव येथे संस्थेच्या स्वत: चे मालकीचे एक हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम उपलब्ध असून सदर गोदाम हे हाॅटेल व्यावसायाकाकरीता पंधरा वर्षांकरिता भाड्याने देण्यात आले आहे.गोदामाच्या अपु-या व्यवस्थेमुळे मागिल एक महिन्यापासून संस्थने शेतकऱ्यांचे धान्य मोजणे सुरू केले नाही.सदर संस्थेने गोदाम उपलब्ध नसल्याचे कारण समोर करून करारनामा करतांनी शासनाला करारनाम्यात हमीपत्र लिहून दिले.आमचेकडे गोदाम उपलब्ध आहेत,आणि आता तेच गोदाम हाॅटेल व्यावसायिकांना भाड्याने देऊन शासनाची दिशाभूल केली आहे. सदर संस्था हेतूपुरस्सर राज्य शासनाला बदनाम करण्याचे उद्देशाने तालुक्यातील एकही धान्य खरेदी केंद्रावर अजूनपर्यंत धान खरेदी सुरू करण्यात आलेल नाही. सदर बाब गंभीर असून संस्थेच्या उपलब्ध गोदामातील हाॅटेल व्यवसाय बंद करून त्याठिकाणी त्वरीत धान्य खरेदी सुरू करण्याचे आदेश देण्यात यावे व शासकीय अनुदानाचा वापर करून बांधण्यात आलेल्या गोदामांमध्ये परिसरातील शेतकऱ्यांची त्वरीत धान्य खरेदी सुरू करण्याचे आदेश देण्यात यावे,तसेच खरेदी विक्री संस्थेने ठाणे गोदावरीचा चुकीचा वापर केल्याप्रकरणी त्यावर कारवाई करण्यात यावी.या मागणीचे निवेदन ई-मेल द्वारे जिल्हा अधिकारी यांना यशवंत परशुरामकर यांनी दिले आहे.