रेल्वे प्रवासात “दो गज की दुरी व मास्क नही है जरूरी

0
21

#कोविडची भीती नाही
#प्रवासात सूचनांचे पालन नाहीच

आमगाव:-कोविड विषाणू प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवासी रेल्वे गाडी पूर्णता बंद केली होती,कालांतराने प्रवासी वाहतूक सेवा कोविड नियमावली ठरऊन काही रेल्वे गाड्या प्रारंभ करण्यात आले. पण प्रवासी या नियमांना डावलून प्रवास करताना दिसत आहेत .
कोरोना प्रदर्भावामुळे देशभरात अनेकांना मृत्यूने जीवन संपले आहे.कोरोना संसर्ग रोगाने प्रत्येक ठिकाणी नागरिकांना बाधित अतिसार माचवला ,यात रुग्णांना गंभीर आजारांना बळी पडावे लागले.कोरोना रोग संसर्ग वाढू नये यासाठी आरोग्य यंत्रनेने अनेक उपाययोजना केल्या व नागरिकांनी ते तंतोतंत पालन करावे याकरिता सूचना देण्यात आले. परंतु शासनाच्या सूचना नागरिक प्रवास्यांनी पहिले कोरोना लाटेत निष्काळजीपणा केला तो दुसऱ्या लाटेत कायम ठेवून चूक सुधारली नाही .त्यामुळे दुसऱ्या लाटेत नागरिक प्रवासीयांना गंभीर परिणाम भोगावे लागले. कोरोना विषाणू आजाराचे रुग्ण सद्यस्थितीत कमी झाले पण पुर्णतः विषाणू रोग संपला नाही .याची जाणीव अजूनही नागरिकांनी घेतली नाही . रेल्वे प्रशासनाने प्रवासी वाहतूक हळूहळू पूर्ववत सुरू करण्यासाठी नियम पाळूनच सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी प्रयत्न सुरू करून काही प्रवाशी गाड्या सूरू केले.पण अनावश्यक गर्दी करून प्रवाश्यानी वर्दळ केली .
हावडा मुंबई रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेच्या काही मोजक्या प्रवासी लोकल , सुपरफास्ट प्रवासी
गाड्या सुरू केले आहे. या गाड्यांमध्ये प्रवासात प्रवाश्यानी कोविड ची भीतीच बाजूला सारून बिनधास्तपणे प्रवास सुरू केला आहे.विना मास्क व सामाजिक अंतर टाळून भरगच्च गर्दीतील प्रवास सुरू केले आहे, त्यामुळे हे प्रवास आता धोक्याचे ठरले आहे.प्रवासात कोणताही सामाजिक अंतर कमी न करता विना मास्क ने आरोग्याला आव्हान देत प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केलेले नियमच प्रवाश्यानी घालवले असे चित्र दिसत आहे.
रेल्वेत प्रवासी यांना कोविड नियंत्रणासाठी कायदा लागू करण्यात आले की नाही असाही प्रश्न निर्माण झाला आहे. विना मास्क व सामाजिक अंतर याला डावलून सर्रास प्रवास सुरू करण्यात आले आहे.त्यामुळे रेल्वे प्रवासामुळे कोविड चा धोका संभवतो आहे.रेल्वेत गर्दीतील प्रवास करताना नागरिक प्रवासी यांना कोविड नियमांची जाणीव प्रशासनाने करून देने गरजेचे आहे.