प्रा. दिवाकर गमे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

0
23

पक्षाध्यक्ष मा. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी भवनात दिले नियुक्तीपत्र!

वर्धा,दि.09ः- विदर्भातील ओबीसी चळवळीमधील कार्यकर्ते,व महात्मा फुले समता परीषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा. दिवाकर गमे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उपाध्यक्ष म्हणुन प्रदेश अध्यक्ष  जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी भवन मुंबई येथे नियुक्ती पत्र देवून नियुक्ती केलेली आहे.
यावेळी प्रदेश राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सरचिटणिस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्र्वरजी बाळबुधे, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, सरचिटणिस राज राजपुरकर,निळकंठ पिसे, विनय डहाके, उपस्थित होते.
प्रा. दिवाकर गमे हे महाज्योतीचे संचालक असुन, ओबीसी चळवळ तसेच शेतकर्‍यांच्या न्यायासाठी विविध आंदोलनात त्यांचा सहभाग आहे.प्रा. दिवाकर गमे यांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मा. छगनराव भुजबळ ,यांचे आभार मानले. राष्ट्रवादी पक्ष हा बळकट करण्यासाठी पुर्ण प्रयत्न करणार असे प्रा. दिवाकर गमे यांनी सांगीतले.