
गोंदिया,दि.9 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती
भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत
सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनांचा लाभ देण्यात येतो. शैक्षणिक सन 2019-20 या वर्षातील
विद्यार्थ्यांचे प्रलंबीत अर्ज त्रुटीपुर्तता करुन (रि-अप्लाय) ऑनलाईन करण्याकरीता 30 जून 2021 पर्यंत मुदत देण्यात
आलेली असून या संधीचा संबंधीत विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.
तसेच शैक्षणिक सत्र 2020-21 मध्ये भारत सरकार शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया डिसेंबर 2020
पासून सुरु झालेली आहे. विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज 31 मार्च 2021 पूर्वी सहाय्यक आयुक्तांच्या आयडीवर
पाठविणे आवश्यक होते. त्याबाबत कार्यालयाने वारंवार पाठपुरावा केलेला आहे. परंतू अद्यापही महाविद्यालय
स्तरावर अनुसूचित जाती-617, इतर मागासवर्ग-1565, विमुक्त जाती भटक्या जमाती-237 व विशेष मागास प्रवर्ग-
118 असे एकूण 2537 विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबीत आहेत. तरी सर्व महाविद्यालयांनी 11 जून 2021 पूर्वी अर्ज
तपासणी करुन पात्र अर्ज सहाय्यक आयुक्तांचे आयडीवर पाठविण्यात यावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक
आयुक्त डॉ.मंगेश वानखडे यांनी केले आहे.