पोलीस स्टेशन डुग्गीपारतर्फे वीर बिरसामुंडा बलीदान दिनानिमीत्त मोगर्रा येथे आरोग्य शिबीराचे आयोजन

0
15

कोसमतोंडी:-(महेंद्र टेंभरे):-– वीर बिरसामुंडा बलीदान दिवस निमीत्त व नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात नक्षल चळवळीला आळा बसविण्याचे उद्देशाने शासकिय विभागामार्फत विवीध उपक्रम राबवुन नक्षलग्रस्त भागातील नागरिकांशी जास्तीत जास्त समन्वय साधता येईल याकरीता विश्व पानसरे पोलीस अधिक्षक सा. गोंदिया, अशोक बनकर अपर पोलीस अधिक्षक सा. गोंदिया कँम्प देवरी, जालंधर नालकुल उपविभागीय पोलीस अधिकारी सा. देवरी यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन डुग्गीपार तर्फे आज दि.09/06/2021 रोजी मौजा मोगर्रा येथील क्रांतीसुर्य बिरसामुंडा चौकात मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर आरोग्य शिबीरामध्ये गावातील लोकांची वैदयकिय तपासणी व कोव्हीड लसीकरण करण्यात आले तसेच कोरोना विषाणु प्रादुर्भाव संबंधाने प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत मार्गदर्शन करुन जनजागृती करण्यात आली. सदर आरोग्य शिबीराला गावातील 120 लोकांनी प्रतिसाद देवुन तपासणी केली व 40 लोकांनी कोव्हीड लस घेतली असे एकुण 160 लोकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतला.
सदर आरोग्य शिबीरास डाँ. विकास विंचुरकर वैदयकिय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शेंडा व त्यांचे पथक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मंदिटोला येथील आरोग्य सेवक सेविका, गावातील आशा वर्कर तसेच गावाचे सरपंच मोहन सुरसाऊत, माजी उपसरपंच अरुण लेदे, लेखलाल टेकाम तमुंगा अध्यक्ष, सुरेश बोरकर पोलीस पाटील देवपायली, माजी पोलीस पाटील शालीकरामजी पटने व ईतर प्रतिष्ठीत नागरिक, पोलीस स्टेशन डुग्गीपारचे ठाणेदार सचिन वांगडे , सपोनि. संजय पांढरे, पो.उपनि. विनोद भुरले व पोलीस अंमलदार हजर होते.