
गोंदिया दि.10 : कोविड-19 च्या महासंकटामुळे गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 693 जणांचा दुर्दैवी मृत्यू
झालेला असून जिल्हा प्रशासन अशा कुटूंबांना भेट देत आहेत व त्यांचे मनोबल वाढविण्याचे प्रयत्न करण्यात
येत आहे. संकटामध्ये सापडलेल्या या कुटूंबांना आपण कशाप्रकारे मदत करु शकतो याबाबतचे आवाहन सर्व
शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामाजिक संघटना यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले
होते.
सदर आवाहनाला प्रतिसाद म्हणून के.एम.जे.मेमोरीयल हॉस्पीटल व रिसर्च सेंटर गोंदियाचे संचालक
डॉ.अमित जयस्वाल यांनी कोविड-19 मध्ये मृत्यू पावलेल्या कुटूंबियांना यापुढे स्त्रीरोग तपासणी आणि
वैद्यकीय चिकित्सक सल्ला विनामूल्य करणार असल्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी राजेश खवले यांना
सादर केले. त्याबाबत जिल्हाधिकारी गोंदिया यांनी डॉ.अमित जयस्वाल यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले.