केंद्र सरकारने सात वर्षात जनतेला केवळ महागाईची भेट दिली : राजेंद्र जैन

0
35

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन साजरा

गोंदिया,दि.10ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापणदिनानिमित्त रेलटोली येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात आयोजित कार्यक्रमात माजी आमदार राजेंद्र जैन यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम केले. कोरोनामुळे राज्य सरकार आर्थिक संकटात असताना सुध्दा धानाला खासदार प्रफुल पटेल यांचा प्रयत्नातून ७०० रुपये बोनस दिला. खा.पटेल यांनी कोरोना संक्रमण काळात दोन्ही जिल्ह्याला ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला. तसेच दोन्ही जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले. त्यामुळेच ऑक्सिजनच्या तुटड्यावर मात करण्यास मदत झाली. कोरोना संक्रमण काळात खासदार पटेल यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली. दोन्ही जिल्ह्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबध्द असल्याची ग्वाही माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिली.
जैन म्हणाले केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा जोडून हमीभाव देण्याचे जाहीर केले होते. मात्र हे आश्वासन सुध्दा हवेतच विरले. धानाच्या हमीभावात केंद्र सरकारने केवळ ७२ रुपयांची (MSP) वाढ करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. याचा राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते. केंद्र सरकारची धोरणे शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांना जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. खोटे आणि मोठे बोलून केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने मागील सात वर्षांच्या काळात जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचे काम केले. पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडर दरात प्रचंड वाढ करुन जनतेला महागाईची भेट देण्यापलिकडे काहीच केले नाही. केवळ समाज – समाजात तेढ निर्माण करण्यापलिकडे काहीच केले नाही. केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून या सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करावे असे प्रतिपादन माजी आ. राजेंद्र जैन यांनी केले. या वेळी उपस्थित वरिष्ठ पदाधिकारी मार्गदर्शन केले. कोरोना संक्रमण काळात मृत पावलेला व्यक्तीना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून भावपूर्ण श्रद्धांजली दिली.
या प्रसंगी पूर्व आमदार राजेंद्र जैन यांचा सोबत सर्वश्री जिल्हाध्यक्ष विजय शिवनकर, नरेश माहेश्वरी, शिव शर्मा, विनोद हरिणखेडे, गंगाधर परशुरामकर, अशोक सहारे, प्रभाकर दोनोडे, राजलक्ष्मी तुरकर, गणेश बरडे, केतन तुरकर, मनोज डोंगरे, रफिक खान, बाळकृष्ण पटले, आशा पाटिल, जितेश टेंभरे, विनीत सहारे, मनोहर वालदे, खालीद पठाण, रवि मुंडदा, राजु एन जैन, राजेश तुरकर, रमेश कुरील, डाँ रुपसेन बघेले, नागो बन्सोड, मोहन पटले, श्रीधर चन्ने, संजीव राय, विनायक शर्मा, मामा बन्सोड, प्रतिक भालेराव, हरबक्ष गुरनानी, सुनील पटले, शैलैश वासनिक, करण टेकाम, संतोष रहांगडाले, पटले, विजय धरमगोडीया, देवेंद्र सुर्यवंशी, लव माटे, पंकज चौधरी, त्रिलोक तुरकर, दिलीप पाटिल, सय्यद इकबाल, कपील बावनथडे, कृणाल बावनथडे, डाँ.मोहित गौतम, योगेश डोये, धनराज सुर्यवंशी, संजीव रावत, नरेंद्र बेलगे, रौनक ठाकूर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.